ग्रामपंचायत कसबा उत्तूर, ता. आजरा, जि. कोल्हापूर

सरपंच कार्यकाल


सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख प्रतिनिधी असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जबाबदार असतो. त्याचे कार्य गावातील नागरिकांसाठी पारदर्शक, कार्यक्षम व जलद प्रशासन सुनिश्चित करणे आहे.

उत्तूरला विद्यमान उच्चशिक्षित सरपंच म्हणून श्री. किरण आमणगी यांचा लाभ झाला आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गावाच्या विकासाचा संकल्प करून कार्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच ११ वर्षांनी झालेल्या महालक्ष्मी यात्रेची मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. तसेच आठवड्यातून ‘एक दिवस गावासाठी’ हा उपक्रम सुरू करून त्या दिवशी गावाची स्वच्छता सर्वांनी स्वयंप्रेरणेने करण्याचे आवाहन केले आहे, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
भविष्यात तरुण खेळाडूंना सरावासाठी मैदानाची उपलब्धता, गावात सांस्कृतिक सभागृह, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आदी सोयी निर्माण व्हाव्यात यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तसेच प्रस्तावित सुसज्ज व भव्य बसस्थानक लवकरात लवकर उभे राहावे यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

मुख्य जबाबदाऱ्या

महत्त्वाची कामगिरी (गेल्या कार्यकाळातून)

  1. गावातील रस्त्यांचे दुरुस्ती व नूतनीकरण
  2. शुद्ध पिण्याच्या पाण्याची योजना अंमलात आणणे
  3. शाळा व आरोग्य सुविधा मजबूत करणे
  4. सार्वजनिक स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सुधारणे
  5. महिला व युवक सक्षमीकरणासाठी उपक्रम राबवणे
  6. ग्रामातील विकास निधीचे पारदर्शक व्यवस्थापन

सन्माननीय सरपंच

क्र. नाव कालावधी
1श्री. दादू गुंडू पाकले24-05-1952 ते 26-11-1956
2श्री. बाबुराव गुराप्पा आमणगी27-11-1956 ते 26-11-1960
3श्री. दादू गुंडू पाकले27-11-1960 ते 26-11-1964
4श्री. गोपाळराव विष्णुपंत कुलकर्णी27-11-1964 ते 01-12-1969
5श्री. बापुसो भाऊसो धुरे15-12-1969 ते 28-01-1972
6प्रशासक29-01-1972 ते 03-07-1969
7श्री. गोपाळराव विष्णुपंत कुलकर्णी04-07-1972 ते 23-06-1976
8श्री. अमृतराव लक्ष्मण पाटील24-06-1976 ते 11-07-1978
9श्री. मुकुंदराव यशवंतराव आपटे12-07-1978 ते 28-03-1992
10श्री. तानाजी दादासो धुरे29-03-1992 ते 31-10-1992
11श्री. प्रकाश सोमशेखर तौकरी01-11-1992 ते 26-11-1997
12श्री. आप्पासो बाबुराव बामणे27-11-1997 ते 26-11-2002
13सौ. मालुबाई शंकर आमणगी27-11-2002 ते 26-11-2007
14श्री. रमेश कृष्णा ढोणुक्षे27-11-2007 ते 26-11-2012
15सौ. सुप्रिया युवराज पाटील27-11-2012 ते 13-08-2015
16सौ. वनिता रमेश ढोणुक्षे14-08-2015 ते 02-06-2016
17सौ. हर्षदा राजाराम खोराटे03-06-2016 ते 26-11-2017
18सौ. वैशाली उमेश आपटे26-11-2017 ते

सन्माननीय उपसरपंच

क्र. नाव कालावधी
1श्री. बाबुराव गुराप्पा आमणगी27-11-1952 ते 26-11-1956
2श्री. गणपती महादेव गुरव27-11-1956 ते 26-11-1960
3श्री. शामराव धोंडीबा बरगे27-11-1960 ते 26-11-1964
4श्री. बाबुराव गुराप्पा आमणगी27-11-1964 ते 14-12-1969
5श्री. मुकुंदराव यशवंतराव आपटे15-12-1969 ते 26-09-1971
6श्री. विष्णू भैरू घेवडे27-09-1971 ते 28-01-1972
7प्राशासक29-01-1972 ते 03-07-1969
8श्री. अमृतराव लक्ष्मण पाटील04-07-1972 ते 23-06-1976
9श्री. भिकाजीराव दादासो पाकले12-07-1978 ते 26-07-1981
10श्री. विठ्ठल दत्तात्रय यमगेकर27-07-1981 ते 17-04-1984
11श्री. शंकरराव बापूसो भाईगडे18-04-1984 ते 31-10-1992
12सौ. वनमाला मारुती राजाराम01-11-1992 ते 26-11-1997
13श्री. मारुती ज्ञानदेव घोरपडे27-11-1997 ते 26-11-2002
14श्री. शिरीष बाजीराव देसाई27-11-2002 ते 26-11-2007
15श्री. शिरीष बाजीराव देसाई27-11-2007 ते 20-06-2010
16श्री. संजय आप्पासो पोतदार20-06-2010 ते 26-11-2012
17श्री. महेश काशिनाथ करंबळी27-11-2012 ते 14-07-2014
18श्री. संजय धोंडीबा उत्तूरकर15-07-2014 ते 07-09-2015
19श्री. बबन पांडुरंग इंगळे08-09-2015 ते 26-07-2016
20श्री. धोंडीराम भिकाजी सावंत27-07-2016 ते 26-11-2017
21श्री. सचिन तुकाराम उत्तूरकर27-11-2017 ते